"आय लव यु" बोलयचच राहतो
रेसकोर्सवर धावताना घोडा
हळुच घोडीकडे बघतो
आज रेस जिंकलो तर
डिनरला नेईन म्हणतो...
बघा दिवसा ढ्वळ्या पक्षी
पक्षीणीला साद देतो
" वाट बघु नकोस गं , चिमणे "
कोकिळेकडेच जेवणार सांगतो...
बोकोबाही चालु आमचा
चोरुन दुध पितो
हळुच दुध पिता पिता
मनीलाही चोरुन नेतो...
भुंग्यांचही बरं त्यांना
बोलायलाच कुणी नसतो
कधी जाई-जुई वर , तर
कधी रातराणी वरही बसतो...
मोतीचीच गंमत बघा
रोज मजा करतो
आज "पपीबरोबर" तर
उद्या "पिंकीबरोबर" फ़िरतो...
कसला माणूस बुद्धीमान
साला सगळीकडेच हरतो
म्हातारा होत आला तरी
"आय लव यु" बोलयचच राहतो...
Posted by
• » ѕωαρηιℓ ωαк¢нαυяє « •
0 comments:
Post a Comment
• » मराठी कविता « •