कविता लिहिणे सोपे
समजावणे जड असते...
मनातील भावनांचे
व्यक्त करणे अवघड असते...
बोलणे सोपे जरि
शब्द सापडणे जड असते...
मी बोललो काही
तिला समजणे अवघड असते...
स्पर्शाने केल्या खुणा
ओळखणे जड असते...
मी केला स्पर्श तिला
तिचे थांबणे अवघड असते...
आता तिलाच कळु देत
प्रेम माझ्या मनीचे...
मी सांगणार नाही
मी किती प्रेम करतो तुझ्यावर...आणि कधी समजवणारही नाही...बघुया कधी समजतेस ते.
Posted by
• » ѕωαρηιℓ ωαк¢нαυяє « •
0 comments:
Post a Comment
• » मराठी कविता « •