अशीच एक कविता झुरलेली
रात्र गहन होत जाते ना जशी
तशीच काहीशी मनात उतरलेली…
कुठुनशी एक झुळुक आलेली…
हसत हसतच एक ओळ देऊन गेली
ओलं झालेल मन माझ अजुन तसच आहे
रात्रीच्या स्पर्शात गोठलेल ते गाण
अजुनही तसच आहे..
अगदिच काही नाही
पण आपल थोड दुःख वाटुन गेली
जातांना मला बिलगून म्हणाली
भेटत जा की मधुन मधुन…
कधीतरी मन हलक करायला बर वाटत…
तुझ्या संगतीत माझ गाण बघ कस आपसुकच पुर होत
अशीच एक कविता झुरलेली..........
Posted by
• » ѕωαρηιℓ ωαк¢нαυяє « •
0 comments:
Post a Comment
• » मराठी कविता « •