बैचेन अशी होवू नकोस
मन भटकू देवू नकोस
मी येतोय तुझ्या जीवनात
माझी वाट तू पाहू नकोस
रस्त्याकडे डोळे लावू नकोस
भासांच्या मागे धावू नकोस
मी करेन तुझ्या ह्रदयात प्रवेश
मला इतरत्र तू शोधू नकोस
आरशात सारखं पाहू नकोस
ओठ आता रंगवू नकोस
मी जीवनचं तूझं रंगवून टाकेन
तू शरीर आपलं रंगवू नकोस
रात्र आता जागवू नकोस
जास्त विचार तू करु नकोस
मी येईन प्रत्यक्ष समोर तुझ्या
स्वप्नात मला तू शोधू नकोस
यापुढे...
तुझ्या ह्रदयाची धडधड मी असेन
तुझ्या स्वप्नातला राजकुमार मी असेन
तुझ्या आयुष्याचा सोबती मी असेन
तू आता तू नाहीस तर मीच असेन
दोनच पावलं एकटी चाल आता...
पुढच्या वळणावर उभा मी असेन...
Posted by
• » ѕωαρηιℓ ωαк¢нαυяє « •
0 comments:
Post a Comment
• » मराठी कविता « •