तुझी वाट पहातोय
तुझी वाट पहातोय..............
आयुष्यात माझ्या केव्हा येशील
चंद्र तारे सोबत घेऊन,
वेडयासारखा प्रत्येक वळणावर
तुझी वाट पहातोय मन तुला देऊन.
माझ्या वेडया मनास कधी ओळखशील
माझ्या भावनांना कधी समझुन घेशील,
प्रेमाला माझ्या कधी साद देशील
तुझी वाट पहातोय कधी होकार देशील.
माझ्या प्रेमाची तुला जाणीव असतानाही
का अशी परक्यासारखी वागतेस,
हक्क माझ्यावर गाजवतानाही मनापासुन भेटायला
तुझी वाट पहातोय सांग कधी येतेस.
ओठांवरील शब्दांना बोलकं केलं तुझ्या नयनांनी ,
घायाळ केलं मला तुझ्या ओठांवरील् शब्दांनी,
कधी येतेस भेटायला चेहरा खुलवुन निरागस भावनांनी,
तुझी वाट पहातोय ये भेटायला हळूवार पावलांनी...
तुझी वाट पहातोय..............
Posted by
• » ѕωαρηιℓ ωαк¢нαυяє « •
0 comments:
Post a Comment
• » मराठी कविता « •