मन वेडं झालं आहे
प्रेमात जगताना
मन वेडं झालं आहे
तुझ्या खट्याळ गोष्टी पाहताना...
आज त्रस्त मी झालो
तुझ्या 'अशा वागण्याला... '
आज त्रस्त मी झालो
तुझ्या 'तशा पाहण्याला... '
" हा मुलगा असा कसा...,
आणि तो कित्ती छान ...'
तुझ्या अशा बोलण्यावर
मी हरवून बसतो भान
मग मी त्रस्त होतो,
तुला नको ते बोलतो...
माझ्या रागावर हसतेस ,
आणि तु मला अजुनच छलतेस...
बऱ्याच वेळेला तर
खुप शब्दफेक होते
तुझे आणि माझे भांडण
नंतर अजुनच रंगते...
भांडणाचा हा रंग
उग्र होत असताना
आपल्या दोघांनाही
इतरत्र भान नसताना
तु मला अगदीच
निःशब्द करतेस
तुझं म्हणणं माझ्यावर
उगीचच् लादतेस...
क्षणात जवळ घेवून तु
आपल्यातली तेढी मितावितेस
माझ्या मनातही नसताना अचानक
तु ' SORRY' म्हणतेस...
पण आजकाल असकाही कधीकधी वागतेस...आणि जरा जास्तच भाव खातेस...
Sametime बज़्ज़ करून...न बोलण्यांची धमकी देटेस...
आणि मनात मात्र जरा जास्त च खुश होतेस...
आपल्या ह्या भांडणातल्या प्रेमावर ,
मी खुप प्रेम करतो, आणि तू ही करत आसशील...
ही भांडणं अशीच राहू दे...
Posted by
• » ѕωαρηιℓ ωαк¢нαυяє « •
0 comments:
Post a Comment
• » मराठी कविता « •