मराठी कविता.....• » мαяαтнι ρσєм « •

आपल्या कविता (एक संग्रह) !! इत्यादी !!!!!!!

तिच्याविना आहे माझी प्रत्येक मैफ़ल सुनी .
तिला सांगितलंय का कुणी ?
तिला सांगितलंय का कुणी ?

सांगायाचे आज तिला मी रोज ठरवतो ,
पण ती येता समोर मजला घामच फ़ुटतो .
ओठावरचे शब्दही जाती ओठांतून परतुनी..!
तिला सांगितलंय का कुणी ?
तिला सांगितलंय का कुणी ?
तिचे बोलणे फ़क्त वाटते ऐकत राहावे .
तिने हासता तिच्या गालची खळीच व्हावे .
तिने आणि तिनेच यावे माझ्या स्वप्नातुनी..!
तिला सांगितलंय का कुणी ?
तिला सांगितलंय का कुणी ?

तिच्याविना आहे माझी प्रत्येक मैफ़ल सुनी .
कधी वाटते असतील आमुची जिवलग नाती ,
कधी भासते कुणी दूरची अनोळखी ती .
उगाच मजला छळण्याची की खोड तिची ही जुनी..!
तिला सांगितलंय का कुणी ?
तिला सांगितलंय का कुणी ?

तिलाही कळते सारे मजला ठाऊक आहे
खात्री नाही तरीही आशा अंधुक आहे
भाव मनीचे आज ना उद्या घेईल ती समजुनी..!
तिला सांगितलंय का कुणी ?
तिला सांगितलंय का कुणी ?

0 comments:

Post a Comment

• » मराठी कविता « •

About this blog

About Me

• » ι ℓσνє мυѕι¢,ѕнαソαяι,gαzαℓѕ,ѕмѕ,ρσєтяソ &αмρ; мαкє @ ηєω ƒяιєη∂ѕ... « •

Member

Blog Archive

Blog Archive