मनाप्रमाणे जगण्यासाठी वेळच नसतो
मला, स्वप्नही बघण्यासाठी वेळच नसतो…
वसंत येतो, श्रावण येतो अनेकदा; पण
फुलण्यासाठी, भिजण्यासाठी वेळच नसतो…
ओळख असलेलेच भेटती लोक मला, पण
बघून ‘त्यांना’ हसण्यासाठी वेळच नसतो…
प्रेम कुणीही का माझ्यावर करीत नाही?
प्रेम कुणा का करण्यासाठी वेळच नसतो?…
नशिबी असते जे-जे, घडते ते-ते तेव्हा
नशिबी माझ्या ‘घडण्यासाठी’ वेळच नसतो…
‘अजब’ चालली कशाला पुढे इतकी दुनिया?
कुणास मागे वळण्यासाठी वेळच नसतो..
Posted by
• » ѕωαρηιℓ ωαк¢нαυяє « •
0 comments:
Post a Comment
• » मराठी कविता « •