मराठी कविता.....• » мαяαтнι ρσєм « •

आपल्या कविता (एक संग्रह) !! इत्यादी !!!!!!!

आठवतोयस तू मला…….. !!

आठवतोयस तू मला,
जेव्हा शोधते मी माझ्या काळजाला,
भूलविलेस ज्या क्षणी तू,
आठवताना त्या क्षणाला !!

आठवतोयस तू मला,
रात्री स्वप्ने पाहताना,
झोपेत स्मित करताना,
दचकून जागे होताना !!

आठवतोयस तू मला,
खिडकीतुन चन्द्र पाहताना,
एकांतात पावसाच्या सरी,
अंगावर झेलताना !!

आठवतोयस तू मला,
सुखाचा क्षण अनुभवताना,
मोकळ्या केसात माझ्या,
हात फिरवताना !!

आठवतोयस तू मला,
तुझ्या कविता वाचताना,
डोळ्यातून वाहणारे,
मोती वेचताना !!

आठवतोयस तू मला,
श्वास घेताना,
तू जवळ नसता,
तो अडवून बघताना !!

पडायच असत प्रेमात कधी कधी

बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी..

पाहताना तिच्याकडेच दाखवायच असत

विचारात गुंतल्यासारख कधी कधी

अन पाहताना तिच्याकडेच

विचारात गुंतायच असत कधी कधी..

रात्री पहायची असतात स्वप्ने तिचीच…

जागुन अशी रात्र काढावी कधी कधी

नंतर “जागली होतिस का रात्री?”

म्हणून विचारावे कधी कधी..

मागायचा असतो देवाकडे..

हात तिचा चोरुन कधी कधी

द्यायच असत आश्वासन त्यालाही

पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी..

चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या

विषय तिचा निघाल्यावर कधी कधी

असते रागवायचे लटकेच

“अस काही नाहिये” म्हणून कधी कधी

विरहात तीच्या …

असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी..

पाहुन हात तिचा दुसर्‍या हाती ..

असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी..

पडायच असत प्रेमात कधी कधी

बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी

मनाप्रमाणे जगण्यासाठी वेळच नसतो
मला, स्वप्नही बघण्यासाठी वेळच नसतो…
वसंत येतो, श्रावण येतो अनेकदा; पण
फुलण्यासाठी, भिजण्यासाठी वेळच नसतो…
ओळख असलेलेच भेटती लोक मला, पण
बघून ‘त्यांना’ हसण्यासाठी वेळच नसतो…
प्रेम कुणीही का माझ्यावर करीत नाही?
प्रेम कुणा का करण्यासाठी वेळच नसतो?…
नशिबी असते जे-जे, घडते ते-ते तेव्हा
नशिबी माझ्या ‘घडण्यासाठी’ वेळच नसतो…
‘अजब’ चालली कशाला पुढे इतकी दुनिया?
कुणास मागे वळण्यासाठी वेळच नसतो..

गंधाळलेला गुलाब,
माझ्या ओठांवर फुलाला,
मखमली स्पर्शाने त्या,
ओठांचा रंग गडद केला !

चंचल वाराही,
तुला फितूर झालेला,
मला पाहण्यासाठी,
खर तर तू आतुरलेला !

घननिले नभ तुझ्या,
साथीला धावले,
तुझ्या मिठीत मला,
खेचून आणले !

थेम्बाथेम्बाने त्या,
कशी जादू केलि,
तुझ्या माझ्या अंतरी,
सतार छेडूनी गेली !

पाहता तू असे चोरून,
जिव वेडाउन गेला,
तुझ्या मनातला कल्लोळ,
माझ्या डोळ्यात उमटला !!

कधी मी वारयाची झुलूक असते
तर कधी बेफाम वारा असते

कधी मी पावसाची हलकी सर असते
तर कधी समुद्रची लाट असते

कधी मी डोलनारे कणिस असते
तर कधी खम्बिर तरु असते

कधी मी शांत नदी असते
तर कधी भिरभिर्नारे फूलपाखरू असते

मी तो सुर आहे

जो मनाला दिलासा देतो,
तर कधी हुरहुर लावतो

बस आणि काय सांगू
सगलच लिहिता येत नाही
म्हनून म्हणते
मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही……

तू अल्लड नदी
की
अवखळ वारा ?
तू राजकुमारी
की
माझी स्वप्न सुंदरी ?
माझ्या हृदयाची देवी
की
स्वच्छंदी सिहांची छावी ?
तू अजाण बालिका
की
चंचल मनाची संचालिका ?
तू शांत सागर
की
तू धगधगते नगर ?
तू प्रेमाची मूर्ति
की
सौंदर्याची अभिजात कलाकृति ?
तू माझी माऊली
की
माझ्या प्रेमाची सावली ?
तू जगण्याची आशा
की
तू कातरवेळची निशा ?
तू यशाचा थंड झरा
की
तू धगधगता निखारा ?
तू मंदिरातील समई मंद
की
तू जीवनातील मुक्त छंद ?
तू पहिल्या पावसाचे थेंब
की
माझे प्रतिबिंब ?

उरलेल्या ह्या श्वासांची शप्पत
साथ तुझी सोडणार नाही
हा पाऊस नसला तरी
माझे बरसणे थाबणार नाही || १ ||
डोळे मिटून घे अन्
घे हा मातीचा सुगंध
त्यातही शेवटी येईल तुला
फ़क्त माझाच मंद गंध || २ ||
तू असे म्हणतोस
की तुझ्या आठवणीवर जगायचेय
माझ्या आठवणी असताना
मला सोबतीला का घ्यायचेय ? || ३ ||
तू नाही आता एकटा
मीही तुझ्या साथीला आहे
मृगजळ नाही तर
माझ्या प्रेमाचा वर्षाव आहे || ४ ||
म्हणुन खरे सांगते तुला
मला हवीय सोबत तुझी
मी आहे फ़क्त तुझी
तू राहशील का माझा ? || ५ ||
तू नव्हतास तेव्हा
“जीवन” माझे होते व्यर्थ
तुझ्या साथीमधेच माझ्या
“जीवनाला” आहे अर्थ || ६ |

सर्वात सुंदर काय … ?
मैत्रीतले मन ..
का ..
मनातली मैत्री ?
मनात असते तुझीच मैत्री
का ….
तुझ्याच मैत्रीत मन ?
कोडे……..
मनातील तुझे विचार
का …..
तुझ्या विचारांनी भरलेले मन ?
कोडे …..
विचारां मधे फ़क्त तू
का ….
तू म्हणजे फ़क्त विचार ?
कोडे …..
तू म्हणजे मन
का …..
तू म्हणजे मैत्री ?
कोडे…..
तू म्हणजे प्रेम
का
प्रेम म्हणजे तुझी मैत्री ?
कोडे…..

कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं
आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं
जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
प्रेमात पडू लागतो

कधी हसणं विसरून गेलो तर
ते हसायला शिकवतात
जीवन हे खऱ्या अर्थाने
जगायला शिकवतात

पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात….

आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं
त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं

कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी
त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी

म्हणूनच ……..
असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ
जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर
एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा
” I LOVE YOU ”

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही

पहिले जेव्हा तुला फक्त तुलाच बघत राहिलो
फक्त तुलाच पहावे असेच दिनक्रम करत राहिलो
खरच तुझ्या नादाने मी स्वता लाच हरवत राहिलो
काय करू प्रेमाचा ताज महल् ला सजवीताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

आज नाहीतर उद्या बोलेन दिवस फक्त जात आहे
कधी येईल ती वेळ त्याचीच वाट पाहत आहे
यशस्वी नक्की होऊ हेच मनाला समजवात आहे
खरच आता तुझ्याशिवाय मला जगताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

दिवस रात्र फक्त तुझाच विचार येत च आहे.
माझी पावले तुझ्याच मागे जातच आहे
हृदयात या माझ्या प्रेमाचे झरे वाहातच आहे
काय करू माझी प्रेमाची धार तुझ्या हृदयात वाहताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे……..

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण थकल्यावरही आधारसाठी त्याच्याकडेच पहावे……..

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे………

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच राहावे, जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे…….

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे………..

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
सूर त्याचा आणि शब्द माझे असावे

सखे, तुझ्या ओल्या केसात
सुरांचा उन्माद असु दे

तुझ्या केसातुन बरसावं… माझ्या शब्दांचं वादळ
त्याला कवितांचा नाद असु दे

तुझ्या रातराणी मेहेफ़िलिनं… छेडावी जीवघेणी गझंल,
माझ्या उध्वस्त जीवाची
…………………….त्याला उन्मुक्त दाद असु दे

तो मोहाचा घोट प्यायला…. मी कधी पासुन आतुर,
तुझ्या अनावर पाशाची
……………………त्याला मनसोक्त साद असु दे

सखे, तुझ्या ओल्या श्वासात
माझा….
…………………….गुलमोहरी श्वास असु दे

तुझ्या देहावर फ़ुलावा….. माझ्या स्पर्शाचा सडा,
तुझ्या मस्तवाल कळ्यांना
……………………..माझ्या मिठीचा वास असु दे

तुझी कातरवेळ असावी….. माझ्या रात्रीला बिलगायला व्याकुळ,
तुझ्या संधी प्रकाशाला सुद्धा
……………………माझ्या विरहाचा भास असु दे

तुझ्या पारीजातकानं झुरावं…….. माझ्या उन्मत्त बहाव्यासाठी,
तुझ्या वसंतातल्या श्रुंगाराला
…………………..माझ्या पानझडीचा ध्यास असु दे

सिनेमात पाऊस येतो, तेव्हा हीरोइनला पारदर्शक कपड्यात भिजवणं दिग्दर्शकाला खूप आवडतं. राज कपूर, यश चोप्रा यांची तर ही खास आवड. पण अनेक सिनेमांमध्ये अशी अनेक गाणी आहेत जी पावसाची आहेत, पण त्यात हीरोइनला अजिबात भिजवलेलं नाही. तरीही ही गाणी पाऊस पडला की हमखास आठवतात.

.........

सिनेमात पावसाचं गाणं नाही, मग तो हिंदी सिनेमाच नाही. हीरो-हीरोइन यांच्यातल्या प्रेमातला एकमेव साक्षीदार असतो तो पाऊस. पावसात भिजत प्रियकराची मनधरणी करणारी हीरोइन आपण खूपदा पाहिली आहे. प्रेमी जिवाला प्रेमाचं भरतं आलं की हमखास पाऊस पडायला हवा असतो. पण अनेक सिनेमांमध्ये अशी गाणी असतात. ज्या गाण्यात पाऊस असतो पण पडद्यावर मात्र अजिबात पडत नसतो. तरीही पावसाची गाणी म्हटलं की, अशी गाणी आठवायला लागतात.

' जब वी मेट' या सिनेमात 'तुमसे ही दिन होता है...' या गाण्यात पाऊस पडतो. त्या गाण्यात पिवळ्या छत्रीत करिश्मा काळ्या ड्रेसमध्ये बिनधास्त नाचते आणि शाहिद कपूर ड्रायव्हरने ऑफर केलेली छत्री बाजूला सारून नाचतो. याच सिनेमात शास्त्रीय गायक राशीद खान यांच्या आवाजातलं 'आओगे जब तुम वो साजना' हे गाणं आहे. गाण्यातली सिच्युएशन पावसाची अजिबात नाही पण, 'बरसेगा सावन अंगना फूल खिलेंगे' असं म्हणत पावसाच्या येण्याची प्रफुल्लता प्रियकराच्या येण्याइतकीच आनंददायी असते, हे सांगून टाकते.

' युवा' सिनेमात अदनान सामी आणि अलका याज्ञिकने गायलेलं एक सुरेख गाणं आहे. त्या गाण्याची सिच्युएनही पावसाची नाही आणि पावसाचं गाणं नाही. पण तरीही त्यात पाऊस आहे.

बादल वो आये, आये

गमीर् बढ़ाये, हाये

पानी भी लाये

उसकी मर्जी

असं म्हणत पावसाचा लहरीपणा माणसाचाही स्थायी भाव दाखवून देतो. 'इन दिनो' हे 'लाइफ इन मेट्रो' सिनेमात पाऊस खूप छान कॅरेक्टर म्हणून येतो. 'दस' सिनेमात हरिहरनच्या आवाजातलं एक अप्रतिम गाणं आहे. सिनेमातल्या अॅक्शन आणि 'दस बहाने करके ले गया दिल' या गाण्यामुळे त्या गाण्याकडे जरा दुर्लक्षच झालं. 'बंद आखो से तूम आज तूम को देखले' या गाण्यात पाऊस आणि भावना या किती सारख्या असतात, हे सांगतात कवीचा अंदाज खूप शायराना झाला आहे.

ये किस लिए इन आखों मे

सिसक रही है बारीशे

आणि मग

बूंद बूंद छलके टपके

बरसे मेरा मन

भीग भीग जाये

भीगेे होठ से सावन

अशा शब्दांमध्ये पाऊस पडतो. अर्थात, मठ्ठ चेहऱ्याचा सुनील शेट्टी आणि इशा देओल यांनी कितीही ठरवलं असतं तरी या शब्दातल्या भावना खचितच पडद्यावर दाखवता आल्या असत्या. कदाचित हे गाणं लोकांच्या स्मरणात न राहण्याचं तेही एक कारण असावं.

' बॅण्डिट क्वीन' नावाचा सिनेमा. फुलनदेवीच्या आयुष्यावरचा. सिनेमातली अनेक दृश्यं आपल्या अंगावर येणारी. याच सिनेमात एक पावसावरचं अप्रतिम गाणं आहे. अर्थात, त्यात पाऊस मात्र नाही. फुलनच्या आयुष्यातल्या एकमात्र सुखाचा क्षण चित्रित करताना बॅकग्राउण्डला हे गाणं वाजतं. उस्ताद नुसरत फतेह अली खान यांनी गायलेलं गाणं तब्बल आठ मिनिटांचं आहे.

कामधंद्यासाठी परदेशी गेलेल्या पतीला उद्देशून लोकगीताच्या ओळी आधी कोरसमध्ये येतात.

सावन आया रिमझिम सावरे

आये बादल कारे कारे

मतवारे प्यारे प्यारे

मोरे अंगना झूमके

घिर घिर आयी उड़ी उड़ी

देखो मस्त घटाये

फुर फुर आज उड़ाये आँचल

मोरा सर्द हवाये...

अशा शब्दांमधून पावसापूवीर्चं मस्त ढगाळ वातावरण अनुभवता येतं. आणि नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजात 'मोरे सैया तो है परदेस मै क्या करू सावन को, सुना लागे सजन बिन देस... असं म्हटल्यावर पावसात आपल्या प्रिय व्यक्तीचा विरह किती जीवघेणा असतो, याची जाणीव होते.

' सत्या' हा अण्डरर्वल्ड या विषयावरचा सिनेमा. या सिनेमात 'गिला गिला पानी' असं पावसावरचं चिंब चिंब भिजवणारं गाणं आहे. ऊमिर्ला मातोंडकरला कॉटन साडीत भिजवण्याचा मोह रामूला या गाण्यात आवरला नव्हता. याचं सिनेमात भूपेंदने खूप वर्षांनी एक गाणं गायलं. 'बादलो से काट काट के...'. या गाण्यात गुलाार लिहून जातो,

एक बार तुमको जब

बरसते पानियो के पार देखा था

यू लगा था जैसे

गुनगुनाता एक आबसार देखा था

तबसे मेरी नींद में बरसती रहती है...

संजय लीला भन्साळीच्या '१९४२ अ लव स्टोरी' सिनेमात पावसाचं अप्रतिम गाणं आहे. 'रिमझिम रिमझिम....' पिवळ्या साडीत गोड दिसणारी मनीषा कोईराला आणि अनिल कपूर यांना अजिबात न भिजवता हे गाणं चित्रित केलं आहे. तर अगदी अलीकडच्या 'थोडा मॅजिक थोडा प्यार'मध्ये 'सिधी सपाट जिंदगी...' या गाण्यात

कभी सोचा है क्या, बारीश क्यू भाये

क्यू गीत बेवजह, होंठो पे आये

हा पाऊस आपल्याला गाणं लिहायला भाग पाडतो, असं प्रसून जोशी सांगून टाकतो.

हवाहव्याशा वाटणाऱ्या पावसाची अनेक गाणी आहेत. पण कोणालाही न भिजवता आपल्या चिंब करणारी गाणीही खूप आहेत. फक्त जरा कान देऊन ती ऐकायला हवी इतकंच.

मनातील शब्दांची फुलपाखरे हळूच कागदावर उतरली
...आणि बघता बघता एक कविता जन्मास आली !
कविता जणू वाटत होती एखाद्या तान्ह्या बाळासारखी
!नुकतीच या अनोळखी जगात पाऊल ठेवलेली,
आपल्या अस्तित्त्वाचा शोध घेणारी ..
.मग वाटू लागली ती एखाद्या नववधू सारखी ,
थोडीशी बावरलेली, थोडीशी संकोचलेली...
आपण लोकांना आवडू की नाही या विचारात रमलेली !
कधी कविता वाटते जवळच्या मैत्रिणी सारखी,
आपल्या सुखात व दुःखात सहभागी होणारी ...
आपल्या भावना समजून घेणारी !
शेवटी प्रत्येक कवितेला असतं एक स्वतःचं व्यक्तिमत्त्व,
ती ही शोधत असते सगळ्यांमध्ये आपलं वेगळं अस्तित्त्व --

प्रेम विवाहाच्या मी अगदी विरुध्द आहे,
कारण गुणांपर्यत ठीक आहे,
दोष कळले की ते एक न संपणरं युध्द आहे!
तु कौलेजला आलीस कीमाझी नजर तुझ्यावर
खिळतेत्यातुनच पुढचं आयुष्य जगायचीस्फुर्ती मला मिळते!
तु इतकी सुंदर आहेस कीकुणाचही तुझ्यावर
प्रेम बसेलखुप भाग्यवान ठरेल तोज्याच्यावर
तुझं प्रेम बसेल!प्रेमे मिळणं ही सुध्दाएक कला
आहे,पण मी प्रेम मिळवु शकलो नाहीयाचं दु:ख मला आहे!
शाळेत मुलीच्या बाजुला बसणंही आमच्यावेळी शिक्षा होती
आज कुणीतरी बाजुला बसावंही माझी छोटीसी अपेक्षा होती!
चारोळ्या लिहिताना डोळ्यासमोरनेहली फक्त तु असतेस,
तेंव्हा तर डोळे उघडे असतात,पण हल्ली डोळे मिटल्यावरही दिसतेस!

""लाख क्षण अपूरे पडतातआयुष्याला दिशा देण्यासाठीपण,
एक चुक पुश्कळ आहेते दिशाहीन नेण्यासाठी,,,,,,,,,,,,,,,,!
किती प्रयास घ्यावे लागतातयशाचं शिखर चढण्यासाठीपण,
जरासा गर्व पुरा पडतोवरुन खाली गडगडण्यासाठी,,,,,,,,,,,,!
देवालाही दोष देतो आपणनवसाला न
पावण्यासाठीकितींदा जिगर दाखवतो आपणइतरांच्या मदतीला धावण्यासाठी,,,,,,,,,!
किती सराव करावा लागतोविजश्रीवर नाव कोरण्यासाठीपण,
जरासा आळस कारणीभूत ठरतोजिंकता जिंकता हरण्यासाठी,,,,,,,!
कितीतरी उत्तरं अपुरी पडतातआयुष्याचं गणित सुटण्यासाठीकितीतरी
अनुभवातनं जावं लागतंआयुष्य कोडं आहे पटण्यासाठी,,,,,,,,,!
विश्वासाची ऊब द्यावी लागतेनात्याला जिवनभर तारण्यासाठीएक
अविश्वासाचा दगड सक्षम आहेते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी.""

एक प्रवास मैत्रीचाजश्या
हळुवार पावसाच्या सरींचाती पावसाची सर
अलगद येवुन जावीअन
एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..
एक प्रवास सहवासाचाजणु अलगद पडणार-या
गारांचान बोलताही बरच काही सांगणाराअन
स्पर्श न करताही मनाला भिडणारा..
एक प्रवास शुन्याचाजणु हीमालयाशी भिडण्याचाशुन्यातुन
नवे जग साकारणाराअन
नव्या निर्मितीची चाहुल देणारा..
एक प्रवास जगण्याचाक्शणा क्शणाला
माणुस घडवण्याचाहसता हसता रडवणाराअन
रडवुन हळुच हसवणारा..
एक प्रवास प्रेमाचाभुरभुरणार-या
दोन जिवांचाजिंकलो तर संसार मांडायचाअन हरलो
तर नवीन वाटा शोधायच्या..
एक प्रवास प्रयत-नांचासुख़ दुख़ातील नाजुक
क्शणांचाअखंड घडवणार-या माणुसकीचाअन
नवी उमेद देणार-या घडींचा..एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचासाठवु म्हंटले
तर साठवणींचाआठवु म्हंटले तर आठवणींचा.

घोंघावणारा वारा
तुला - मला वेडावत होता
आणि किना-याच्या पाण्याने
स्व:ताच बेभान होत होता

त्याच पाण्याने तुझं
माझ्याशी गुढ संवाद साधणं
आणि झटकन जवळ येऊन
तु मला बिलगणं
मी स्वासात कंठ रोखुन
फक्त तुझ्याकडे पहात होते
हे स्वप्न की सत्य
माझे मलाच उमगत नव्हते

नाही म्हटलं तरी तु मला
तुझंच करुन टाकलं होतं
पण फेसाळणा-या लाटांनी
हे गुपित मला सांगितलं होतं
--
--
--
Best Regards,
$W@P

खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ...

काट्या वरुन चालताना एकदा हसुन बघ,
आपल्या विरहातिल गेलेले क्षण एकदा मोजुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

गळुन पडलेल्या झाडाच्या एका-एका पाना कडे बघ,
जीव लावून जगवलेल्या झाडाला एकदा मरताना बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

जीवनात मिळालेल्या सुख-दुःखाची बेरीज करुन बघ,
बाकी काहीच उरले नाहि याचा अंदाज घेवून बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

मुसळधार पावसात विस्कटलेल्या घराकडे बघ,
माझ्या जीवनरुपी आकशात दुःखाच्या विजेचा तांडव एकदा बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

स्वतःच्या जिवंतपणी मॄत्युला डोळ्या समोर बघ,
तो हि लवकर येत नाहि म्हणुन खंत करणाऱ्या माझ्या मनाकडे बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

खरंच तुझ्या प्रेम भंगाने मी किती तुटुन पडले आहे हे समजण्या साठि...
एकदा माझ्यावर मनापासुन खरे प्रेम करुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

प्रेम भंगाने मला लागलेल्या झळा एकदा तु पण अनुभवून बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

कशी असते आई..?

कोणी सांगेल का मला कशी असते आई..?
लाखोंच्या लेखनातुन ऎकली आहे तिची पुन्याई

कोणी सांगेल का मला कशी असते आई..?
अनुभवायची आहे मला,
शांत झोपे साठि हवी असनारी तिची गोड अंगाई,

कोणी सांगेल का मला कशी असते आई..?
अनुभवायची आहे मला,
माझ्या आजारपणात तिची होनारी घाई,

कोणी सांगेल का मला कशी असते आई..?
अनुभवायची आहे मला,
तिच्या सोबत बागेत फुलनाऱ्या जाई आणि जुई,

कोणी सांगेल का मला कशी असते आई..?
अनुभवायची आहे मला,
मायेचा घास भरवताना चिऊ-काऊ सोबत होणारी तिची बोलनी,

कोणी सांगेल का मला कशी असते आई..?
अनुभवायची आहे मला,
माझ्या खट्याळपणात मारावी अशि चापटी,

कोणी सांगेल का मला कशी असते आई..?
अनुभवायची आहे मला,
कधिही न मिळालेली प्रीति,

कोणी सांगेल का मला कशी असते आई..?
अनुभवाय्ची आहे मला अशी सुखाची शिदोरी..?

खरच कोण सांगेल का मला कशी असते आई..??

मित्र हो!
माझ्या प्रेमाची मला,
परतफ़ेड मिळाली आहे,
मी गुन्हेगार नसतानाही,
त्याची पुरेपुर शिक्षा मी भोगली आहे.

त्याच्या साठि आज चारोळ्या लिहिल्या,
माझ्या मनाची अवस्था समजेल म्हणुन,
त्या प्रसिद्धिला आणल्या,
त्याने मात्र त्या आजवर नाहि वाचल्या.

आमच्या प्रेमाच्या साक्षिला सुरुच्या बागा होत्या,
समुद्राच्या ठिकाणी जाणाऱ्या नागमोडी वाटा होत्या,
मंदिरातली अबोल देवाची मुर्ति होती,
न पाहीलेलि अशी दुरवर विसावलेली आमची मने होती.

आज तो आहे नामवंत हुद्यावर,
ओळख देवू शकत नाही मी त्याची यावर,
तो आहे आज खुप सुखांवर,
पण तो मागे आहे आज प्रेमाच्या मुद्यावर.

खरचं प्रेमात मी खुप काही हरवल आहे,
माझं शिक्षण-माझी नोकरी,
सुखाचे दिवस सोनेरी,
उरली फ़क्त चारोळीच्या रुपातुन मिळणारी शांती.

आज तो माझ्या प्रत्येक श्वासात आहे,
त्याच्या आठवणी माझ्या ह्र्दयाचा भाग आहे,
माझ्या कवितांत तोच आहे,
दुसरे कुठे काय आहे?

तुम्हाला सांगु,
माझ्या चारोळ्या प्रेमाची अखंड गाथा आहे,
खऱ्या प्रेमात किती भोग आहे,
या साऱ्याचीच ती खरी व्यथा आहे.

माझ्या चारोळ्यात मी माझ आयुष्य उतरवलं,
शब्दांच्या गुंफ़नातुन त्याला सजवलं,
त्याच्या विरहानेच मला आज,
कवयित्रि बनवलं.

त्याला अभिमान होता स्वत:च्या रुपावर,
स्वत:च्या तल्लख बुद्धीवर,
मला अभिमान होता माझ्या लेखणीवर,
जे त्याचे आयुष्य एकदा तरी,
कागदावर उतरवेल यावर.

About this blog

About Me

• » ι ℓσνє мυѕι¢,ѕнαソαяι,gαzαℓѕ,ѕмѕ,ρσєтяソ &αмρ; мαкє @ ηєω ƒяιєη∂ѕ... « •

Member