मला आठवत तु म्हटल होतस आज परत एकदा ..तु ..मी समोरासमोर…. विसरले नाही मी तुझ ते बोल…कंट्रोल+ अल्ट + डिलीट
वेगळे होवुया….
नको असलेल्या नात्याच
ओझ आता नको उचलुया….
किती सहज … चेह-यावरची रेष न हलवता….
बघत राहीले तुला क्षणभर….
अन चांदण्याच दिसल्या मला भर दुपारी…
काहीच कळेना…तु शांत काही रीअक्ट न होता
अन मग सारे सोपस्कार… कागदोपत्री
कुठलाही वाद नाही… प्रश्न नाही
शोधत राहीले मी उत्तरे न विचारलेल्या प्रश्नांची….
आज तुला मी हवेय…. का???
एकटेपण सहन होत नाही…..
की शरीराची भुक संपत नाही…
आठवत तरी का तुला ते अंधुकस..???
येस…. आज मी तुला तेच सांगतेय….
”मी तुला केलय माझ्या जिवनातुन
कंट्रोल+ अल्ट + डिलीट!!! ”
Posted by
• » ѕωαρηιℓ ωαк¢нαυяє « •
0 comments:
Post a Comment
• » मराठी कविता « •