सुखस्पर्शी लाटा अविरत वारा
अफाट जल अथांग
आणी हा समुद्रकिनारा
भावनांचा उद्रेक कधी उदासीनतेचा मारा
मनी आठवणींचे काहुर
आणी पारवा भिरभिरणारा
एकांताचा खडक विचारांचा झरा
कल्लोळ दाटलेला
आणी माझ्यातला मी तळमळणारा
मिटलेले ओठ डोळे पाणावले जरा
भरुन येई ऊर
आणी सुर्य मावळणारा
मन शांत होईपर्यंत बसे मी त्या समुद्रकिनार्यापाशी
तो विचारे मग मला, येशील ना रे उद्या?
आणी मी परतणारा..
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी...
कधी शिकवण कधी आठवण,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण...
आपल्या मैत्रीचे दिवस पंखाखाली घेत,
प्रेमाचे मृगजळ शोधतेयं माझे हे जीवन..
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवनारी,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी
मला खुपदा प्रश्न पडतो
आयुष्य कसं असतं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या तळ्यासारखं
कुणीही यावं, एखादा दगड टाकुन जावं
दगड टाकणारा निघुन ज्जतो,
पाण्यात खळबळ माजवुन जातो,
अशा वेळेस काय करावं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या लाकडासारखं
कुणीही यावं, एखदी ठिणगी टाकुन जावं
वाळ्लेलं असेल तर जाळ होतो नाहीतर .
नुसताच धुर ओल्या लाकडाचा
अशा वेळेस काय करावं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या प्याद्या सारखं
आपला रस्ता फक्त सरळ असतो
पण त्यात कुणीही मधे येतो,
हत्ती, घोड, वजिर अणि कधी कधी राजा सुध्धा
मागेही वळता येत नाही,
अशा वेळेस काय करावं?
पण मला वाटतं...
आयुष्य कसं असावं?
ढगातुन पडणार्या पावसाच्या सरी सारखं
तिला कुणीही अडवु शकत नाही
तिला कुणीही जाळु शकत नाही
एकदा वरुन खाली झोकुन दिल्यावर
तिला माहित नसतं, आपण कुठे पडणार आहोत
शेतातल्या काळ्या मातीवर की,
शहरातल्या डाबंरी रस्तावर
कुणा धनिकाच्या रौक गार्डनवर वर कि
कुणा गरीबाच्या झोपडीवर?
रस्तावर बसलेल्या भिकर्याच्या थाळित कि,
'येरे येरे पावसा' म्हणत सोडलेल्या कागदाच्या होडित?
पण कोठेही पडो
तिचा उद्देश एकच असतो
दुसर्याला निर्मळ बनवन्याचा
दुसर्याला फुलविण्याचा
दुसर्याला आनंद देण्याचा........
मी....
"वादळाच्या कुशीतून मी
आताच उठून आलो आहे
गालावरच्या पावसाला एक
वाट करून आलो आहे
निळ्याशार पाण्यात मी
एकच बिंब पाहिले होते
वळून जेव्हा पाहिले तेव्हा
फक्त शब्दच उरले होते
याच किनारी बसून आपण
एक संध्याकाळ रंगवली होती
क्षितिजाला तेव्हा मी
हळूच हुलकावणी दिली होती
एकच साथ हवी होती
सोबत तुझ्या जगण्याची
हातामध्ये हात घेऊन
मॄगजळ पाहण्याची
किनारावर आजही मी
शांत उभा आहे
ओढून मला घेशील
याची वाट पाहत आहे
'आता माझे फक्त, एकच म्हणणे आहे
कधीही मला तू पुन्हा भेटू नकोस'
आता निदान थांबलो आहे
तेव्हा मी थांबणार नाही
माझे जीवन तेव्हा मी
माझ्या हाती ठेवणार नाही
म्हणूनच,
वादळाच्या कुशीतून मी
आताच उठून आलो आहे
गालावरच्या पावसाला एक
वाट करून आलो आहे"